शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: कवलापूर विमानतळ जागा विक्रीची प्रक्रिया रद्द, तीनही प्रस्ताव फेटाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:31 IST

दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत

सांगली : कवलापूर विमानतळाची जागा विकण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने रद्द केला आहे. या जागेसाठी आलेले तीनही प्रस्ताव फेटाळल्याची माहिती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिली.कवलापूर विमानतळाची १६० एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आहे. या जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी काही कंपन्यांनी प्रस्ताव दिले होते; पण याविरोधात विमानतळ बचाव कृतीची स्थापना करण्यात आली. विमानतळाची जागा उद्योगाला देण्यास तीव्र विरोध केला. या जागा खरेदीत लोकप्रतिनिधी व बड्या व्यापारी उद्योजकांचा समावेश होता. वाढता विरोध लक्षात घेता त्यांनीही माघार घेतली. अखेर एमआयडीसीने जागा खरेदीच्या स्पर्धेतील श्री श्रीष्ठा कंपनी, सांगली स्पाईस बोर्ड आणि कृष्णा व्हॅलीचे प्रस्ताव फेटाळले आहेत.साखळकर म्हणाले की, विमानतळाच्या लढ्याला पहिले यश मिळाले आहे. या लढ्यात कवलापूर येथे दोन कृती समिती स्थापन झाल्या आणि सांगलीत पक्षविरहीत विमानतळ बचाव कृती समितीने ताकदीने लढ्याचे नेतृत्व केले. विमानतळ जागेच्या कागदपत्रांपासून ते तांत्रिक बाबींपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा सुरु केला. धावपट्टीचे आरक्षण कायम आहे; पण विमानतळासाठी जागा कमी पडते हे वास्तव आहे, मात्र जागा खरेदी अशक्य नाही, हा मुद्दा पुराव्यांनिशी समोर आणला. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खासदार संजय पाटील यांनी विमानतळाला पाठिंबा दिला आहे. कृष्णा व्हॅली चेंबरने विमानतळासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे खासगी कंपन्यांना जागा विक्रीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत

समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार म्हणाले, दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत. कुणी उद्योजक, व्यापारी व्हायचे, हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. शासकीय जागा लाटायचा बाजार एकजुटीने हाणून पाडला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळ