कासेगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या विश्रामगृहात बांधकाम साहित्य

By Admin | Updated: December 1, 2014 00:12 IST2014-11-30T22:09:55+5:302014-12-01T00:12:45+5:30

नाहक त्रास : वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची अडचण

Kasegaon Pvt. Construction material in health center's lodging house | कासेगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या विश्रामगृहात बांधकाम साहित्य

कासेगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या विश्रामगृहात बांधकाम साहित्य

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घोलप हे गेल्या चार महिन्यांपासून परिचारिका विश्रामगृहात राहत आहेत. त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या शासकीय विश्रामगृहात खासगी ठेकेदाराने सिमेंट, सळी आदी बांधकामाचे साहित्य भरुन ठेवले आहे. डॉ. घोलप यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. पूर्वीचे डॉ. विश्वंभर काटकर यांनी तर आपल्या ‘लेट लतीफ’ कारनाम्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला चांगलेच चर्चेत आणले होते. त्यांच्या बदलीनंतर याठिकाणी कार्यरत असणारे सांगलीचे डॉ. अक्षय घोलप यांना येथील खासगी ठेकेदाराच्या चुकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीचे डॉक्टर या ठिकाणी राहात नसल्याची तक्रार होती, तर आता कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना या ठिकाणी राहण्यासाठी योग्य शासकीय निवासस्थान नसल्याने प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावे लागते. त्यांना मिळालेल्या या खोलीमध्ये पाण्याची व्यवस्था योग्य नाही. तसेच शौचालय व स्वच्छतागृहाचीअवस्था अत्यंत दयनीय असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. भिंतीला तडे गेले असून ठिकठिकाणी छिद्रे पडलेली आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून ही अवस्था असून त्याची दखल वरिष्ठांनी घ्यावी, अशी मागणी होत आहे. घोलप यांनी आपल्या अल्प कारकीर्दीत येथील लोकांचा विश्वास संपादन केला असून ते जातीने रुग्णालयात हजर असतात. सध्या घोलप यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सर्वसामान्य लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

कासेगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या
विश्रामगृहात बांधकाम साहित्य

कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पूर्वीचे डॉ. विश्वंभर काटकर हे आपल्या ‘लेट लतीफ’ कारनाम्यामुळे तालुक्यात चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या बदलीनंतर सांगलीचे डॉ. अक्षय घोलप यांनी आरोग्य केंद्राचा पदभार हाती घेतला. पण येथील ठेकेदाराच्या चुकीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीचे डॉक्टर केंद्रात राहत नसल्याची तक्रार होती, आताच्या डॉक्टरांना निवासस्थानच नाही, अशी स्थिती आहे.

Web Title: Kasegaon Pvt. Construction material in health center's lodging house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.