कासेगावमध्ये ड्रॅगन फ्रूटचे पीक ‘ऑर्बिट’च्या साहाय्याने बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:42+5:302021-09-02T04:55:42+5:30
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्रगतशील युवा शेतकरी स्वप्नील नंदकुमार माने यांनी ड्रॅगन फ्रूट या पिकाचा यशस्वी प्रयोग ...

कासेगावमध्ये ड्रॅगन फ्रूटचे पीक ‘ऑर्बिट’च्या साहाय्याने बहरले
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्रगतशील युवा शेतकरी स्वप्नील नंदकुमार माने यांनी ड्रॅगन फ्रूट या पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. गतवर्षी त्यांनी याची सुरुवात केली. यंदा उत्पादनात चांगली वाढ झाली असल्याने माने यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया या नावानेही संबोधले जाते. हे पीक जगभरात उष्णप्रदेशीय देशांमध्ये घेतले जाते. साधारणत: या वेलीची आयुष्यमर्यादा १५ ते २० वर्षे एवढी असते. प्रतिकूल हवामानात ड्रॅगन फ्रूट पिकासाठी फोर्स प्लस, किंग मेकर हे उत्पादन अत्यंत उपयुक्त ठरले आहे. तसेच ऑर्बिटची उत्पादने ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी आहेत आणि माझ्यासारख्या युवा शेतकऱ्यांनी अनुभव घेतला आहे आणि तुम्हीसुद्धा घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
स्वप्नील माने यांना ऑर्बिट कंपनीचे सेल्स ऑफिसर अतुल राजमाने व वितरक संदीप जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. गतवर्षी कासेगाव, सांगली, सातारा भागात द्राक्ष तसेच उस, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना ऑर्बिट कंपनीच्या शेतीमार्गदर्शक अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभले व प्रॉडक्ट्सचा वापर करून चांगले उत्पादन लाभले.