कसबे डिग्रजला रुग्णालय, दुकान फोडून ४८ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST2021-09-24T04:30:32+5:302021-09-24T04:30:32+5:30

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे औषध दुकान, रुग्णालय फोडून चोरट्याने ४८ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी शीतल ...

Kasbe Digraj hospital, shop broken into 48 thousand lamps | कसबे डिग्रजला रुग्णालय, दुकान फोडून ४८ हजार लंपास

कसबे डिग्रजला रुग्णालय, दुकान फोडून ४८ हजार लंपास

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे औषध दुकान, रुग्णालय फोडून चोरट्याने ४८ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी शीतल भूपाल चौगुले (रा. जैन मंदिराजवळ, कसबे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवार, दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी चौगुले यांचे गावात श्री हनुमान मेडिकल नावाचे दुकान आहे. या दुकानाची कडी कापून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख २८ हजार रुपये लंपास केले. याशिवाय डॉ. प्रणव यांच्या शांती क्लिनीकमधूनही रोख १४ हजार रुपये, तर अर्चना शंकर कदम यांच्या रामकृष्ण मेडिकलमधून ६ हजार असे ४८ हजार रुपये चोरून नेण्यात आले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर चौगुले यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: Kasbe Digraj hospital, shop broken into 48 thousand lamps