कार्वेच्या उपसरपंच जयश्री कोरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST2021-05-21T04:26:47+5:302021-05-21T04:26:47+5:30

कार्वेच्या उपसरपंचपदी जयश्री कोरे यांचा सत्कार सम्राट महाडिक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संगीता मूदुगडे, विठ्ठल मुदुगडे, बाबासाहेब कांबळे, संग्राम ...

Karve Deputy Panch Jayashree Kore felicitated | कार्वेच्या उपसरपंच जयश्री कोरे यांचा सत्कार

कार्वेच्या उपसरपंच जयश्री कोरे यांचा सत्कार

कार्वेच्या उपसरपंचपदी जयश्री कोरे यांचा सत्कार सम्राट महाडिक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संगीता मूदुगडे, विठ्ठल मुदुगडे, बाबासाहेब कांबळे, संग्राम गोईंगडे, भास्कर कोरे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कार्वे, ता. वाळवा येथील उपसरपंचपदी जयश्री कोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पेठ नाका येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांनी सत्कार केला. यावेळी कार्वे गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता मुदुगडे, माजी सरपंच विठ्ठल मुदुगडे, संग्राम गोईंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सम्राट महाडिक म्हणाले, नवनियुक्त उपसरपंच कोरे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत रहावे. गट-तटाचे राजकारण बाजूला ठेवून एकसंघपणे गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. गावात नवनवीन योजना राबवून गावाला विकसित केले पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे जे सुधारणावादी धोरण आहे. त्याचा अवलंब करून गावची प्रगती करावी.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांबळे, महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष भास्कर कोरे, सोसायटी संचालक राहुल कांबळे उपस्थित होते.

Web Title: Karve Deputy Panch Jayashree Kore felicitated