शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

कर्नाळमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या निकालापूर्वीच संपविली जीवनयात्रा : सांगलीतही एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:55 PM

बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच नापास होण्याच्या भीतीने कर्नाळ (ता. मिरज) येथील एका विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी घडली.

सांगली : बारावीचा निकाल लागण्यापूर्वीच नापास होण्याच्या भीतीने कर्नाळ (ता. मिरज) येथील एका विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी घडली. प्रणव दुष्यंत माने (वय १८) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सांगलीतील दुसऱ्या एका घटनेत ओंकार विजय काळे (१९, रा. मोती चौक, बापटमळा) याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्'त खळबळ उडाली आहे.

कर्नाळ येथील प्रणव माने सांगली हायस्कूलमध्ये वाणिज्य शाखेत शिकत होता. यंदा त्याने बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी निकाल असल्याने तो सकाळपासूनच चिंताग्रस्त होता. सकाळी तो घरातून सायकल घेऊन बाहेर पडला. बराचवेळ तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. त्याने सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास कर्नाळ-बिसूर रस्त्यावरील रेल्वे मार्गावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रेल्वे गेटवरील कर्मचाºयाने प्रणवच्या वडिलांना त्याचा छिन्नविछिन्न मृतदेह दाखवला. अंगावरील कपडे, चप्पल व सायकल पाहून प्रणवची ओळख पटली. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. प्रणवचे वडील शेती करतात. त्याला एक लहान भाऊ आहे. दुपारी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.

दरम्यान, सांगलीतील मोती चौकात राहणाºया ओंकार काळे या तरुणानेही बारावीत नापास झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केला. काळे हा आई, वडील व भावासमवेत राहतो. तो चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात शिकत आहे. सकाळी त्याने निकाल पाहिला. पण नापास झाल्याचे कळल्यानंतर तो घरी परतला. यावेळी त्याची आई कोल्हापूरहून सांगलीकडे येत होती. आईने दूरध्वनीवरून संपर्क साधून निकालाची चौकशी केली. पण तो दचकतच दूरध्वनीवरून बोलत होता. घरी आल्यानंतर ओंकार दुसºया मजल्यावरील खोलीत गेला. तेथील खिडकीला त्याने पट्ट्याने गळफास घेतला. तोपर्यंत त्याची आई घरी पोहोचली होती. तिने घरात ओंकारची चौकशी केली असता, तो दुसºया मजल्यावरील खोलीत असल्याचे सांगण्यात आले. ती धावतच खोलीत गेली असता ओंकारने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिने तातडीने त्याला खालून उचलले व आरडाओरड केली.आईचा आवाज ऐकून घरातील लोक व शेजारी धावत आले. त्यांनी ओंकारला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांत नोंद आहे.दोघेही नापासकर्नाळ येथील प्रणव माने याने निकालापूर्वीच आत्महत्या केली. तो तीन विषयात नापास झाला आहे. तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेला ओंकार काळे हा चार विषयात नापास झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होते.आईमुळे वाचले प्राणसांगलीतील ओंकार काळे या विद्यार्थ्याचे प्राण त्याच्या आईमुळे वाचले. त्याची प्रकृती चिंताजनक असली तरी, त्याच्या जन्मदात्रीनेच पुन्हा एकदा त्याला जीवनदान दिले. ओंकारची आई कोल्हापूरला गेली होती. ती सांगलीकडे परतत होती. बारावीचा निकाल असल्याने तिने ओंकारला दूरध्वनी करून निकाल काय लागला, अशी विचारणा केली. पण तो दूरध्वनीवर आईशी फारसा बोलला नाही. यावरून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने घरी आल्या आल्या ओंकारची चौकशी केली. तो दुसºया मजल्यावरील खोलीत आहे असे समजताच ती धावतच त्या खोलीत गेली. तोपर्यंत ओंकारने गळफास लावून घेतला होता. ती लगेचच त्याच्याकडे गेली व त्याला उचलून धरले.

 

फोटो नावाने एडिटोरियलवर सेव्ह आहेत. प्रणव माने व ओंकार काळे