शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:57 IST

कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शिरोळ तालुका सीमेवर कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने महाराष्ट्रातील  कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी आहे.

ठळक मुद्देसीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल

मिरज : कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शिरोळ तालुका सीमेवर कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने महाराष्ट्रातील  कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी आहे.गतवर्षी कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात आले होते. त्याप्रमाणे यावर्षीही कोयनेतून पाणी सोडण्याची कर्नाटक जलसंपदा विभागाची मागणी आहे. मात्र कर्नाटकला पाणी दिल्यानंतर कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून जत परिसरात देण्याच्या अटीमुळे पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने अथणी व कागवाड तालुक्यात नदीकाठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात तीव्र पाणीटंचाई आहे.

कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. अथणी व कागवाड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक व शेतकरी आंदोलन करीत आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र पाणी सोडण्यात आले नसल्याने गोकाकजवळ असलेल्या मलप्रभा नदीवरील हिडकल धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

धरणातून कालव्याद्वारे रायबाग, ऐनापूर येथून कुडचीजवळ कृष्णा नदीत सोमवारपासून दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे २३ मेनंतर कोयनेतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली