कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST2021-07-14T04:32:36+5:302021-07-14T04:32:36+5:30

येळवी येथील गणेश खांडेकर यांच्या घराच्या अंगणात सोमवारी पहाटे एका महिलेचा मृतदेेह आढळून आला. याबाबत पोलीसपाटील वंदना माने यांनी ...

Karnataka woman dies in Yelvi | कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

येळवी येथील गणेश खांडेकर यांच्या घराच्या अंगणात सोमवारी पहाटे एका महिलेचा मृतदेेह आढळून आला. याबाबत पोलीसपाटील वंदना माने यांनी जत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला व जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस नाईक बजरंग थोरात, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांनी पंचनामा केला. गणेश खांडेकर याच्या जबाबात ही महिला कवठेमंहकाळ येथून आणल्याचे त्यांनी सांगितले. तिला मध्यरात्री त्रास जाणवू लागला होता. यातच तिचा मृत्यू झाला. यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता कवठेमंहकाळ बसस्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात ही महिला दिसून आली. तिच्या हातात रुग्णालयातील उपचार घेत असलेली फाईल होती. ती तिने तेथे टाकल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही फाईल पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली असता, संबंधित महिला कर्नाटकमधील जमखंडी येथील असल्याचे समोर आले. यानुसार तिच्या नातेवाईकांचे जबाब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत.

Web Title: Karnataka woman dies in Yelvi