शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कर्नाटकच्या मोफत बस प्रवास योजनेच‍ा महाराष्ट्रातील एसटीला फटका

By श्रीनिवास नागे | Updated: June 14, 2023 15:28 IST

मिरजेत येणारे कन्नड प्रवासी दुरावले

मिरज : कर्नाटक एसटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सवलत केवळ कर्नाटकातील महिलांनाच दिली आहे. महाराष्ट्रातील महिला प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही. मात्र या योजनेचा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्नाटकातील फेऱ्यांना फटक‍ा बसला आहे.मिरजेत वैद्यकीय कारणांसाठी सीमाभागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांपैकी केवळ पाच ते दहा टक्के वाटा महाराष्ट्र एसटीला मिळतो. आता महिलांना मोफत प्रवास योजनेमुळे कर्नाटकातील महिला प्रवाशांना कागवाड सीमेपर्यंतच तिकीट घ्यावे लागेल. याचा आणखी फायदा कर्नाटक एसटीला होणार आहे. महाराष्ट्रात प्रवासी महिलांना ५० टक्के सवलत देताना सर्व महिलांना देण्यात येते. मात्र कर्नाटक एसटीत कर्नाटकातील आधारकार्ड असलेल्या महिलांनाच मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येतो. महाराष्ट्रातून किंवा अन्य राज्यातील महिला प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र या योजनेमुळे मिरजेत येणारे कन्नड प्रवासी दुरावल्याने एसटीला फटका बसला आहे.महाराष्ट्र व कर्नाटकातील आंतरराज्य प्रवासी वाहतूकीच्या कराराप्रमाणे सीमेवरून २५ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहतूकीसाठी परवानगीचे बंधन नाही. कर्नाटक सीमेपासून जवळच सांगली, मिरज ही मोठी शहरे आहेत. याचा मोठा फायदा कर्नाटक एसटीला झाला आहे. मात्र सीमेजवळ कर्नाटकात कोणतेही मोठे शहर नसल्याने सांगली-मिरज एसटी आगाराच्या फेऱ्या अत्यंत मर्यादित आहेत.मिरजेतून अथणी, चिकोडी, जमखंडी या कर्नाटकातील शहराकडे जाणाऱ्या दैनंदिन फेऱ्या केवळ दहा आहेत. मात्र कर्नाटक एसटीच्या दररोज मिरज -सांगलीत फेऱ्यांची संख्या दोनशेपर्यंत आहे. अथणी, चिकोडी व जमखंडी येथून प्रत्येक अर्ध्या तासाला मिरज-सांगलीला जाण्यासाठी कर्नाटक एसटी बस आहे. कर्नाटकच्या अनेक बसेस मिरजेत येऊन बसस्थानकात नोंद न करताच प्रवासी भरून निघून जातात. त्यामुळे कागदोपत्री नोंद फेऱ्यापेक्षा त्यांच्या जास्त फेऱ्या आहेत. कर्नाटक एसटीच्या या आक्रमणापुढे एसटीने हात टेकले असताना आता महिला प्रवाशांना मोफत प्रवास योजना सुरु झाल्याने मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या फेऱ्या अडचणीत आल्या आहेत.

फेऱ्या बंद होण्याची शक्यतामिरजेत विनापरवाना कर्नाटक एसटी बसेस पकडून एसटी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दंडात्मक करवाई केली आहे. मात्र कर्नाटक एसटीचे आक्रमण थांबलेले नाही. कर्नाटकाच्या एकापाठोपाठ एक बसेस धावत असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करणे महाराष्ट्र एसटीला शक्य झालेले नाही. आता मोफत प्रवास योजनेमुळे मिरजेतून कर्नाटकात मोजक्याच असलेल्या एसटी फेऱ्यासुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र