कर्ण मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या करमरकरची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:55+5:302021-02-09T04:29:55+5:30
स्पर्धेचे उद्घाटन जयंतराव पाटील खुले नाट्यगृह येथे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी नागेश ...

कर्ण मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या करमरकरची बाजी
स्पर्धेचे उद्घाटन जयंतराव पाटील खुले नाट्यगृह येथे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून ५०० स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेत पाच किलाेमीटर महिला गटात सायली कोकीटकर (गडहिंग्लज) यांनी प्रथम, श्रावणी कासार (राधानगरी) यांनी द्वितीय, तर अश्विनी जटार (बहादूरवाडी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत वर्षा कुलकर्णी (वय ६६) यांना विशेष पारिताेषिक देण्यात आले. ५ किलाेमीटर ४५ वर्षांपुढील पुरुष गटात पांडुरंग पाटील (कोल्हापूर) यांनी प्रथम. विश्वास चौगुले (कोल्हापूर) यांनी द्वितीय, तर मारुती चाळके (मलकापूर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ५ किलाेमीटर १० ते ४५ वर्षे पुरुष गटात धनाजी चव्हाण (तासगाव) यांनी प्रथम, किरण बर्गे (कराड) यांनी द्वितीय, तर कार्तिक लोंढे (भिवघाट) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
१० किलाेमीटर ४५ वर्षांवरील पुरुष गटात रणजित करमरकर (बेळगाव) यांनी प्रथम, रवींद्र जगदाळे (सातारा) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर कल्लाप्पा मल्लाप्पा तिरवीर (कोल्हापूर) व कैलास माने (कराड) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. १० किलाेमीटर १० ते ४५ वयाेगट पुरुष गटात परशुराम भोई (गडहिंग्लज) यांनी प्रथम, प्रवीण कांबळे (सांगली) यांनी द्वितीय, तर विशाल कांबिरे (सांगली) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी माणिक मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित साळुंखे, उपाध्यक्ष सुशांत मोरे, सचिव बिपीन राजमाने, उमाकांत कापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चौकट
प्रतीक पाटील यांचा सहभाग
‘कर्ण’ प्रतिष्ठानच्या वतीने भरवण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रतीक जयंत पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पाटील म्हणाले, मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची माझी इच्छा होती; पण काही कारणास्तव भाग घेता आला नाही. मात्र ‘कर्ण प्रतिष्ठान’ने ही इच्छा पूर्ण केली. पहाटे साडेपाच वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. काही अंतर धावून त्यांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
फाेटाे : ०८ इस्लामपूर १