करंजी स्पर्धेत विद्या खोचीकर प्रथम--चिमुकल्या हातांनी साकारले आकाशदिव

By Admin | Updated: October 23, 2014 00:09 IST2014-10-22T21:47:02+5:302014-10-23T00:09:44+5:30

इस्लामपुरात सखी मंचतर्फे आयोजन : आशा पाटील द्वितीय, तर रोहिणी जाधव तृतीय---बाल मंचतर्फे कार्यशाळेचे आयोजन

Karjani competition Vidya Khochike first - Akashdhay, a handpicked hands | करंजी स्पर्धेत विद्या खोचीकर प्रथम--चिमुकल्या हातांनी साकारले आकाशदिव

करंजी स्पर्धेत विद्या खोचीकर प्रथम--चिमुकल्या हातांनी साकारले आकाशदिव

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या करंजी महोत्सव स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी पाककलेतील आपल्या अंगभूत कलाकौशल्याची पखरण करीत तिखट व गोड अशा दोन्ही प्रकारातील करंज्यांनी सुगरणींच्या हाताची कमाल दाखवली. या करंजी महोत्सवाला महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत विद्या खोचीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर आशा पाटील, रोहिणी जाधव या द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. स्वाती नलवडे, मीरा श्ािंगण यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सखी सदस्य व इतर महिलांसाठी या करंजी महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिखट व गोड प्रकारची करंजी स्पर्धकांनी बनवून त्याची सजावटीसह मांडणी केली होती. चॉकलेटशाही गुलकंद करंजी, पुडाची करंजी, मोड आलेल्या धान्याची करंजी, चीझ-पनीर-कॉर्न-बीट करंजी, ओल्या नारळाची मँगो करंजी, तिखट मिरची करंजी, कर्नाटकी गोड करंजी, तिरंगा करंजी, ड्रायफूट करंजी, खवा करंजी, मूग डाळ करंजी, नुडल्स करंजी, बटाटा-रताळे करंजी, कांजीवरम शेव करंजी अशा विविध प्रकारातील करंज्यांचा या स्पर्धेत महोत्सव रंगला. सौ. राखी शहा, स्वाद कुकिंग क्लासेसच्या संचालिका सबा शेख यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
या सर्व विजेत्या स्पर्धकांना वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्सचे संदीप वाळवेकर, प्रतिभा वाळवेकर यांच्याहस्ते इंडक्शन कुकर, व्हॅक्युम क्लिनर, ब्लेंडर व उत्तेजनार्थ बक्षिसातील आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या स्पर्धेसाठी वाळवेकर इलेक्ट्रॉनिक्स यांचे प्रायोजकत्व लाभले होते. सखी मंच संयोजिकांनी संयोजन केले. (वार्ताहर)

चिमुकल्या हातांनी साकारले आकाशदिव
बाल मंचतर्फे कार्यशाळेचे आयोजन े
सांगली : ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे ‘माझी दिवाळी माझा आकाशदिवा’ या कार्यशाळेचे सांगलीतील म. के. आठवले विनयमंदिरमध्ये आयोजन करण्यात आले होते.
बाल मंचतर्फे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. दिवाळीनिमित्त बालमित्रांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सांगली बालविकास मंचतर्फे ‘माझी दिवाळी, माझा आकाशकंदील’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत रंग किरण आर्ट ग्रुपचे अमोल शिंदे, अमित विभुते, सिध्दी विभुते, निशिगंधा लाळे, दीपाली पेडणेकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले तसेच विविध साहित्याच्या मदतीने आकाशकंदिलामध्ये नावीन्य कसे आणता येईल, याची सविस्तर माहिती दिली.
आकाशकंदील करत असताना बालचमू विविध प्रकारचे एका वेगळ्या विश्वात रमून गेले होते. या कार्यशाळेस बालविकास मंच सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: Karjani competition Vidya Khochike first - Akashdhay, a handpicked hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.