करगणी अपघात: गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST2021-08-01T04:25:00+5:302021-08-01T04:25:00+5:30

करगणी : करगणी (ता. आटपडी) येथे शुक्रवारी आटपाडी-भिवघाट महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू झाला. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने हा अपघात ...

Kargani accident: Demand for filing a case | करगणी अपघात: गुन्हा दाखल करण्याची मागणी

करगणी अपघात: गुन्हा दाखल करण्याची मागणी

करगणी : करगणी (ता. आटपडी) येथे शुक्रवारी आटपाडी-भिवघाट महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू झाला. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने हा अपघात झाला आहे. यामुळे संबंधित राजपथ कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी रासपाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना देण्यात आले.

आटपाडी- भिवघाट महामार्गाचे काम राजपथ कंपनीकडे अनेक वर्षांपासून आहे. तरीही अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे. अनेक ठिकाणी पूल अर्थवट आहेत. करगणीत महामार्गाच्या दोन्ही बाजूस ड्रेनेज बांधकाम अर्धवट आहेत. अशातच शुक्रवारी सायंकाळी एक युवक आईसह दुचाकीवरून जात होता. यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरुन येणाऱ्या वाहनाशी धडक होऊन अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या अपघाताला जबाबदार आहेत. यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Kargani accident: Demand for filing a case