काेराेना लसीकरण गरजेचे : विक्रम सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:19+5:302021-04-05T04:23:19+5:30
शेगाव : जत तालुका विस्ताराने मोठा आहे. सध्या कोरोनाच्या साथीचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक ...

काेराेना लसीकरण गरजेचे : विक्रम सावंत
शेगाव : जत तालुका विस्ताराने मोठा आहे. सध्या कोरोनाच्या साथीचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. प्रथम ज्येष्ठ नागरिकांनी लस घ्यावी. तसेच ४५ वर्षांच्या पुढील वयोगटातील नागरिकांनीही लस घ्यावी. आपण तब्येतीने कितीही सदृढ असलो तरी लस घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आमदार विक्रम सावंत यांनी केले.
शेगाव (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रास आमदार सावंत यांनी भेट दिली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भारती पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.