शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Sangli: शिराळा परिसरात घुमतेय करवंदे, जांभळाची आरोळी; रानमेवा पर्यटकांसाठी मेजवानीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 18:04 IST

शिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील निसर्गसौंदर्याची पर्यटकांवर नेहमीच भुरळ पडत असते. खासकरून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी जणू ...

शिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील निसर्गसौंदर्याची पर्यटकांवर नेहमीच भुरळ पडत असते. खासकरून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरीत निसर्ग, येथील म्हणजे रानमाळावर फुलणारा करवंदे, जांभूळ, डोंबले हा रानमेवा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. हा रानमेवा घेऊन महिला, पुरुष मंडळी गलोगल्ली फिरत करवंदे घ्या, जांभळे घ्याच्या आरोळी देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.उन्हाळ्यात चांदोली अभयारण्य परिसर, खुंदलापूर, उत्तर भागातील डोंगरी भागात, डोंगरदऱ्यामध्ये, मेणी खोरे आणि गुढे पाचगणी या विभागात मुबलक प्रमाणात मिळणारे करवंद, जांभूळ इत्यादी रानमेवा म्हणजेच स्थानिक आणि पर्यटकांसाठी जणू मेजवानीच असते. हा डोंगरी भाग असल्याने येथील जंगलात मोठ्या प्रमाणात मिळणारा हा रानमेवा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. येथे आंबट गोड करवंद आणि जांभूळ उन्हाळ्यात उपलब्ध असतो.मार्च ते जून या महिन्यामध्ये मिळणारा हा रानमेवा म्हणजेच पर्यटकांच्या आवडीची फळे. काही पर्यटक तर खास डोंगर, जंगलात भटकंती करत याचा आस्वाद घेत असतात. जंगलात किंवा रस्त्याच्या कडेला असणारे तोरणे ही फळे दिसताच येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे पावले आपोआपच थांबली जाऊन त्यादिशेने वळतात. आणखी एखाद्या वळीव पावसाने हजेरी लावली तर करवंदे वेगाने पिकतात.खुंदलापूर आदी भागातील धनगर समाजातील महिला व पुरुष उदरनिर्वाहासाठी हा रानमेवा विकण्यासाठी शिराळा, इस्लामपूर, सांगली आदी भागात जातात. एसटी बसस्थानकावर महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या रानमेव्याच्या पाट्या घेऊन विविध मार्गावर जाताना दिसत आहेत. सध्या डोंबले घेता का ? जांभळे, करवंदे घेता का? अशी आरोळी ऐकू येऊ लागली आहे.

टॅग्स :Sangliसांगली