करंजेचा तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By Admin | Updated: March 13, 2015 23:58 IST2015-03-13T23:35:00+5:302015-03-13T23:58:28+5:30
सुधाकर कृष्णा कुंभार (वय ४७, रा. मेंढेगिरी, ता. जत, मूळ गाव सावळज-सिद्धेवाडी, ता. तासगाव) असे त्याचे नाव

करंजेचा तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
विटा : वडिलार्जित शेतजमिनीच्या नोंदीबाबत विट्याच्या तहसीलदारांनी दिलेला चूक दुरुस्ती आदेश तहसील कार्यालयातून आणून त्याची सात-बारावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेताना करंजे (ता. खानापूर) येथील गावकामगार तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. सुधाकर कृष्णा कुंभार (वय ४७, रा. मेंढेगिरी, ता. जत, मूळ गाव सावळज-सिद्धेवाडी, ता. तासगाव) असे त्याचे नाव असून, शुक्रवारी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास करंजे तलाठी कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.