कारंदवाडी युनिटमध्ये साडेचार लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:25+5:302021-07-14T04:31:25+5:30
कारंदवाडी कारखाना कार्यस्थळावर रोलर पूजन संचालक विराज शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी श्रेणिक कबाडे, प्रदीपकुमार पाटील, एल.बी. ...

कारंदवाडी युनिटमध्ये साडेचार लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार
कारंदवाडी कारखाना कार्यस्थळावर रोलर पूजन संचालक विराज शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी श्रेणिक कबाडे, प्रदीपकुमार पाटील, एल.बी. माळी, दादासाहेब मोरे, माणिक शेळके, आर.डी. माहुली, विजय मोरे, उमेश शेटे, संग्राम चव्हाण उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटमध्ये या वर्षीच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे उद्दिष्ट नक्की पूर्ण करू, असा विश्वास कारखान्याच्या परचेस समितीचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी व्यक्त केला.
राजारामबापू साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटच्या गळीत हंगाम २०२१-२२ चे रोलर पूजन विराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे, जलसंधारण समितीचे अध्यक्ष एल. बी. माळी, माजी उपाध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, संचालक दादासाहेब मोरे, माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतर पाळून स्वत:बरोबर इतरांची काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे.
उपमुख्य अभियंता संग्राम चव्हाण यांनी स्वागत केले. याप्रसंगी युनिटचे मुख्य विजय मोरे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, मुख्य रसायनतज्ज्ञ उमेश शेटे, माजी नगरसेवक शकील मुजावर, प्रवीण पाटील, राजेश पाटील, आनंदराव सूर्यवंशी, अनिल नांद्रेकर, विजय पाटील, बाबासाहेब चौगुले, आकील मुजावर उपस्थित होते. प्रताप गुरव यांनी आभार मानले.