काराजनगीत शेतमजूर महिलेच्या छपरास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:26 IST2021-03-26T04:26:57+5:302021-03-26T04:26:57+5:30
जत : काराजनगी (ता. जत) येथील चिमाबाई सुरेश घाटे-कोळी (वय ३८) या शेतमजूर महिलेच्या छप्पर वजा घरास अचानक ...

काराजनगीत शेतमजूर महिलेच्या छपरास आग
जत : काराजनगी (ता. जत) येथील चिमाबाई सुरेश घाटे-कोळी (वय ३८) या शेतमजूर महिलेच्या छप्पर वजा घरास अचानक आग लागून सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्यासुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक माहिती अशी की, काराजनगी गावाशेजारी चिमाबाई घाटे यांचे छप्पर वजा घर असून, त्या एकट्याच राहत होत्या. सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे चिमाबाई कामासाठी बाहेर गेल्या होत्या. चुलीतील निखारा पेटून घराचे कुड पेटल्यामुळे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. ग्रामस्थांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला; परंतु कडक उन्हात आगीने भयानक रूप धारण केल्यामुळे आग आटाेक्यात आणता आली नाही. या आगीत चार पोती धान्य, दीड तोळे सोने, १ हजार ५०० पेंडी वैरण, रोख ५ हजार रुपये, कपडे व जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य जळून आर्थिक नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी अभिजित सोनपराते यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदतीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे.