कामेरी जिल्हा परिषद शाळेचे यू-ट्युब चॅनल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:15+5:302021-02-05T07:28:15+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ शाळेचे यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले. प्रजासत्ताक ...

कामेरी जिल्हा परिषद शाळेचे यू-ट्युब चॅनल सुरू
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ शाळेचे यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाची प्रास्ताविका शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धनाजी माने यांनी लेखन, शब्दांकन व निवेदित केलेल्या ‘मी शाळा बोलतेय!’ या कामेरी जिल्हा परिषद शाळेचे आत्मवृत्त लेखाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रभारी केंद्रप्रमुख सिंधुताई पाटील मुख्याध्यापिका सुनीता आष्टेकर, शोभा माने, जयश्री कुंभार, सुनील जगताप उपस्थित होते. कामेरी जि. प. शाळेची मॉडेल स्कूलसाठी निवड झाली असून शाळेस आदर्श शाळा बनविण्यासाठी कार्यालय व स्टाफ रूम अद्ययावत करण्यात आले आहे.
फोटो ओळी-०१०२२०२१-आयएसएलएम-कामेरी यू-ट्यूब न्यूज
कामेरी येथील जि. प. शाळेच्या यू-ट्यूब चॅनलचे उद्घाटन सचिन जाधव यांनी केले. यावेळी धनाजी माने, सुमित्रा पाटील, सिंधुताई पाटील, सुनीता आष्टेकर, शोभा माने, जयश्री कुंभार, सुनील जगताप उपस्थित होते.