कामेरी परिसर बनला कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST2021-06-01T04:20:01+5:302021-06-01T04:20:01+5:30
कामेरी : वाळवा तालुक्यातील कामेरी, विठ्ठलवाडी व येडेनिपाणी येथील कोरोना बधितांची साखळी तुटत नसल्याचे चित्र आहे. कामेरीमध्ये अजूनही ...

कामेरी परिसर बनला कोरोनाचा हॉटस्पॉट
कामेरी : वाळवा तालुक्यातील कामेरी, विठ्ठलवाडी व येडेनिपाणी येथील कोरोना बधितांची साखळी तुटत नसल्याचे चित्र आहे.
कामेरीमध्ये अजूनही मास्क न घालता फिरणे, चौकात एकत्र गप्पा मारणे असे प्रकार सुरू आहेत. कोरोना दक्षता समितीला इस्लामपूर पोलिसांचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळेच ग्रामस्थांना भीती राहिलेली नाही. पोलिसांनी दिवसातून एकदा तरी गावातून फेरी मारून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कामेरी व येडेनिपाणी येथे रुग्णांना शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती, मात्र सोमवारी कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४८ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये विठ्ठलवाडी ६, कामेरी ४, येडेनिपाणी ३, गाताडवाडी १ असे १४ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.