काळुंद्रेत मगर पकडली
By Admin | Updated: June 1, 2014 01:14 IST2014-06-01T01:13:50+5:302014-06-01T01:14:11+5:30
मगर ४ फूट ८ इंच लांबीची

काळुंद्रेत मगर पकडली
चरण : शिराळा पश्चिम भागातील काळुंद्रे येथील उंबाळे वस्तीजवळील ओढ्यालगत असलेल्या विहिरीत आज शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान वनविभागाच्या कर्मचार्यांना ४ फूट ८ इंच लांबीची मगर पकडण्यात यश आले. कोकरूड-चांदोली मुख्य रस्त्यावर काळुंद्रे फाटा येथे उंबाळेवस्ती आहे. वस्तीशेजारूनच ओढा गेला आहे. ओढ्यालगतच एक विहीर आहे. या ओढ्यात गेल्या महिन्यापासून या मगरीचा वावर होता. मगरीच्या वावर असल्याने या ओढ्यात शेतकर्यांनी जनावरांना पाणी पाजणे बंद केले होते. आज शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान उंबाळेवस्तीजवळील विहिरीत मगर असल्याने ये-जा करणार्या शेतकर्यांनी वनविभागास कळवले. वनविभागाचे वनरक्षक उस्मान मुल्ला, लक्ष्मण घोळे, शिवाजी पाटील, वैभव गुरव, विकास बोरगे, भगवान वनारे, काकासाहेब आमणे यांना दोन तासाच्या प्रयत्नानंतर मगर पकडण्यात यश आले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली होती. घटनास्थळी वनपाल अशोक देसाई, एस. एस. कदम यांनी भेट दिली. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सापडलेली मगर वनविभागाच्या कर्मचार्यांनी चांदोली धरणात मध्यभागी सोडली.(वार्ताहर)