ढालगावच्या उपसरपंचपदी कल्पना मायणे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:03+5:302021-08-14T04:32:03+5:30
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्पना रमेश मायणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने सणगर समाजाला ...

ढालगावच्या उपसरपंचपदी कल्पना मायणे बिनविरोध
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्पना रमेश मायणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने सणगर समाजाला २९ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना सणगर समाजातून व्यक्त होत आहे.
माधवराव देसाई यांनी आपला कार्यकाळ संपताच उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. सरपंच मनीषा देसाई व ग्रामविकास अधिकारी डी. एस. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी कल्पना मायणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी माधवराव देसाई, विशाल खोळपे, सविता घोदे, विजय घागरे, द्रौपदी घागरे, भीमराव घागरे, मंगल चव्हाण, जनार्धन देसाई, भारत ढोबळे, अभिजित मायणे, पोपट धोकटे, अरविंद स्वामी, दिलीप ठोंबरे, आदी उपस्थित होते.