कलाशिक्षक महासंघ २१ रोजी धरणे आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:29 IST2021-08-13T04:29:30+5:302021-08-13T04:29:30+5:30
सांगली : कला शिक्षक महासंघाने सुधारित वेतनश्रेणीसाठी २१ ऑगस्टरोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार भगवानराव साळुंखे ...

कलाशिक्षक महासंघ २१ रोजी धरणे आंदोलन करणार
सांगली : कला शिक्षक महासंघाने सुधारित वेतनश्रेणीसाठी २१ ऑगस्टरोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या वेतनश्रेणीचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही मंजुरी दिली जात नाही. अन्य जिल्ह्यांत मान्यता मिळाली असताना, सांगलीतच प्रस्ताव मागे ठेवले आहेत. याविरोधात प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेऊ.
निवेदन देण्यासाठी विनोद इंगोले, प्रल्हाद साळुंखे, प्रल्हाद शिंदे, सुहास पाटील, मोहन जाधव, पी. एस. शिंदे, सागर दीक्षित, सचिन गाडे, सुनील चिंचवाडे, विकास माने, हेमंत मोहिते, दिलीप कारंडे, सोमनाथ अवसरे, लालासाहेब साळुंखे, कृष्णा हुलवान, सचिन खारगे, शशिकांत सूर्यवंशी, रूपाली जगदाळे, अधिक खरमाटे, सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.