काेसारीचा ग्रामविकास अधिकारी ‘लाच-लुचपत’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:54+5:302021-09-14T04:31:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जत : कोसारी (ता. जत) येथील ग्रामसेवक संजय यमुना भाते (४६) एक हजार रुपये लाचेची मागणी ...

काेसारीचा ग्रामविकास अधिकारी ‘लाच-लुचपत’च्या जाळ्यात
लाेकमत न्यूज नेटवर्क
जत : कोसारी (ता. जत) येथील ग्रामसेवक संजय यमुना भाते (४६) एक हजार रुपये लाचेची मागणी करून पैसे स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली त्याच्याविराेधात जत पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जत पंचायत समितीकडून मंजूर झालेल्या गोठ्याचे काम तक्रारदाराने मजूर लावून सुरू केले हाेते. या मजुरांचे हजेरीपत्रक सही करून पंचायत समितीस पाठविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी संजय भाते यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली हाेती. तक्रारीची खातरजमा केली असता भाते याने दाेन हजार रुपयांची मागणी करून चर्चेअंती तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जत येथील संभाजीनगर, मोरे कॉलनी परिसरात सापळा लावला. यावेळी संजय भाते हा तक्रारदाराकडून १ हजार रुपये घेताना रंगेहाथ सापडला. त्याच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपआयुक्त सूरज गुरव, अप्पर पोलीस उपआयुक्त सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय कलकुटगी, श्रीपती देशपांडे, अविनाश सागर, राधिका माने, सिमा माने व चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
130921\1930-img-20210913-wa0033.jpg
ग्रामसेवक संजय भाते एक हजाराची लाच घेताना लाच-लुचपतच्या जाळ्यात