कडेगाव नगरपंचायतीचा १०.५८ कोटींचा अर्थसंकल्प, पतंगरावांना श्रध्दांजली : खर्च वगळून आठ लाख शिल्लक राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:09 IST2018-03-28T01:09:42+5:302018-03-28T01:09:42+5:30

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीचा २०१८-१९ चा १०.५८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांच्या

 Kadgaon Nagar Panchayat's budget of 10.58 crores, tribute to Kite Ganga: 8 lac balances apart from the expenditure | कडेगाव नगरपंचायतीचा १०.५८ कोटींचा अर्थसंकल्प, पतंगरावांना श्रध्दांजली : खर्च वगळून आठ लाख शिल्लक राहणार

कडेगाव नगरपंचायतीचा १०.५८ कोटींचा अर्थसंकल्प, पतंगरावांना श्रध्दांजली : खर्च वगळून आठ लाख शिल्लक राहणार

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीचा २०१८-१९ चा १०.५८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. प्रारंभी नगरपंचायतीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना आदरांजली वाहण्यात आली.
अर्थसंकल्पामध्ये महसूल जमा १ कोटी ७९ लाख ८१ हजार ९५७ रुपये, भांडवली जमा ८ कोटी ७८ लाख ८३ हजार ८००, एकूण जमा १० कोटी ५८, तर महसुली खर्च एकूण ९३ लाख ५० हजार ८७४, भांडवली खर्च एकूण ९ कोटी ५८ लाख, असा एकूण १० कोटी ५० लाख ५५ हजार २१४ रुपये, तर ८ लाख ११ हजार ७४३ रुपये रक्कम शिल्लक राहत असल्याची माहिती मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी दिली.
अर्थसंकल्पात तीन टक्के अपंग (दिव्यांग) ग्रस्तांसाठी २ लाख, पंधरा टक्के समाजकल्याणसाठी पाच लाख, महिला व बालकल्याण समाजासाठी ३ लाख, जमीन मोजणी २.५ लाख, इमारत व जागांसाठी ५० लाख, सौरऊर्जा आधारित खांब व दिव्यांसाठी ३० लाख, मटण आणि मच्छी मार्केट व शेडसाठी २० लाख, पाणी पुरवठा योजनांसाठी १० लाख, प्रशासकीय इमारतीत वाढ करणे बांधकामासाठी १ कोटी, पाणी पुरवठा नळाला मीटर बसवण्याकरिता २५ लाख, पूल उभारणी ३१ लाख, सल्लागार अभियांत्रिकी ३ लाख, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ५० लाख, नगरपंचायत मालकीचे गाळे २० लाख, गटारी व नाले २० लाख, प्रसाधनगृह ३८.२१ लाख, स्मशानभूमी गॅस दाहिनी ५० लाख, बगीचे व उद्याने ३० लाख, मुस्लिम स्मशानभूमी २५ लाख, अन्य बांधकामे १८.४२ लाख, इतर विकास आराखडा २५ लाख, घन कचरा जागा कुंपण ५० लाख, वाहने ५० लाख, फर्निचरसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असा एकूण १० कोटी ५८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा आकांशा जाधव यांनी सभेसमोर सादर केला.
यावेळी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, मुख्याधिकारी चरण कोल्हे, बांधकाम सभापती प्रशांत जाधव, महिला बालकल्याण सभापती अश्विनी वेल्हाळ, पाणीपुरवठा सभापती रिजवाना मुल्ला, विरोधी पक्षाचे गट नेते उदयकुमार देशमुख यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

पतंगराव कदम स्मारकासाठी २५ लाख
माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांची कडेगाव शहर ही कर्मभूमी होती. त्यांनी नूतन कडेगाव तालुक्याची निर्मिती केली. कडेगाव ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांचे कडेगाव शहरात स्मारक व्हावे, यासाठी कडेगाव नगरपंचायतीने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद केली.

शिवछत्रपतींच्या स्मारकासाठी ५० लाख
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी कडेगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title:  Kadgaon Nagar Panchayat's budget of 10.58 crores, tribute to Kite Ganga: 8 lac balances apart from the expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.