कडेगावकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:40+5:302021-08-22T04:29:40+5:30
फोटो-२१कडेगाव१ कडेगाव : शासनाच्या विविध विकास योजनांमधून कडेगाव शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली असून, शहराच्या विकासासाठी ...

कडेगावकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
फोटो-२१कडेगाव१
कडेगाव : शासनाच्या विविध विकास योजनांमधून कडेगाव शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली असून, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कडेगावकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
कडेगाव शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांत कडेगाव शहरात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्ण केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरासाठी खास बाब म्हणून निधी खेचून आणला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आपली राजधानी म्हणून येथे विकासकामांचा डोंगर उभा केला. आता विकासाचा समतोल साधत कडेगाव स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जतेश कदम, ज्येष्ठ नेते गुलामहुसेन पाटील, सुरेश थोरात, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, विजय शिंदे, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, मुख्याधिकारी कपिल जगताप उपस्थित होते.