कडेगाव प्रजासत्ताक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:16+5:302021-02-05T07:19:16+5:30

कडेगाव तालुक्यातील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

Kadegaon in Republic Day excitement | कडेगाव प्रजासत्ताक दिन उत्साहात

कडेगाव प्रजासत्ताक दिन उत्साहात

कडेगाव तालुक्यातील प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ.शैलजा पाटील यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना येथे उपाध्यक्ष पोपट महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपंचायत कडेगाव येथे माजी सैनिक तानाजी देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्षा नीता देसाई यांचेसह सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत तडसर सरपंच हणमंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत मोहित्यांचे वडगाव येथे मृणाल मोहिते या दहावीत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तलाठी कार्यालयाने आशा स्वयंसेविका धनश्री कुंभार यांना आणि दूध संस्थेने यास्मिन शिकलगार यांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला.

Web Title: Kadegaon in Republic Day excitement