कडेगावला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:40+5:302021-09-04T04:31:40+5:30
कडेगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने १० तर भाजपने ७ जागा जिंकल्या होत्या. ...

कडेगावला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा राजीनामा
कडेगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने १० तर भाजपने ७ जागा जिंकल्या होत्या. ओबीसी महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित होते. काँग्रेसच्या आकांक्षा जाधव तर उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे साजिद पाटील यांची निवड झाली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले. त्यानुसार नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निता देसाई यांची निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजू जाधव यांना संधी देण्यात आली. त्यानंतर पक्षाने ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नगराध्यक्षपदी संगीता राऊत तर उपनगराध्यक्षपदी दिनकर जाधव यांची निवड झाली होती.
आता सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम तसेच सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड होणार आहे.