ज्योती पाटील यांचा इस्लामपुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST2021-04-14T04:23:53+5:302021-04-14T04:23:53+5:30

इस्लामपूर येथे सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झालेल्या ज्योती पाटील यांचा सत्कार विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ...

Jyoti Patil felicitated in Islampur | ज्योती पाटील यांचा इस्लामपुरात सत्कार

ज्योती पाटील यांचा इस्लामपुरात सत्कार

इस्लामपूर येथे सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झालेल्या ज्योती पाटील यांचा सत्कार विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमृत पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील श्रीमती ज्योती प्रकाश पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्रात सहायक मोटर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक विक्रम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले, ज्योती पाटील या अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांचे त्या लहान असतानाच निधन झाले. त्यांच्या आईने शेतात मोलमजुरी करून ज्योती यांचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर सात वर्षांनी कोणत्याही परिस्थितीत आपण शासकीय अधिकारी होण्याची जिद्द बाळगली. दोन वर्षाचे लहान मूल असतानासुद्धा १५-१५ तास अभ्यास केला. प्रादेशिक परिवहन विभागाच्या ४० जागांसाठी महाराष्ट्रातील दीड लाख मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यामध्ये ज्योती पाटील यांनी मिळविलेले यश प्रेरणादायी आहे.

यावेळी अमृत पाटील, योगेश शेजावळे, योगेश पाटील, प्रकाश पाटील, बी. एस. पाटोळे, सुदर्शन मोकाशी उपस्थित होते.

Web Title: Jyoti Patil felicitated in Islampur