दोघांना न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: January 3, 2016 00:56 IST2016-01-03T00:52:27+5:302016-01-03T00:56:20+5:30

कसून चौकशी : अर्जुन पवारच्या पोलीस कोठडीत वाढ

The judicial custody of both of them | दोघांना न्यायालयीन कोठडी

दोघांना न्यायालयीन कोठडी

सांगली : इस्लामपूर येथील डॉ. प्रकाश कुलकर्णी व अरुणा कुलकर्णी या दाम्पत्याच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या कुलकर्णी यांच्या रुग्णालयातील मदतनीस सीमा यादव व तिचा प्रियकर नीलेश दिवाणजी या दोघांची न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, संशयित अर्जुन पवार याच्या पोलीस कोठडीत पाच जानेवारीपर्यंत वाढ झाली आहे. नव्याने आणखी दोन संशयित ताब्यात घेऊन चौकशी सुरु ठेवली आहे.
गेल्या महिन्यात कुलकर्णी दाम्पत्याचा घरात घुसून निर्घृण खून करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण व इस्लामपूर पोलिसांनी संयुक्त तपास करुन दुहेरी खुनाचा छडा लावला होता. त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचे पोलीस सांगत आहेत. पण यामागे दुसरेच कारण असल्याची चर्चा इस्लामपुरात आहे. पण त्याद्दष्टीने पोलीस तपास करीत आहे का नाही, हे समजून येत नाही. संशयित पवारची कसून चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: The judicial custody of both of them