‘जोडी तुझी माझी’मध्ये सखींनी लुटला आनंद
By Admin | Updated: December 17, 2014 23:56 IST2014-12-17T23:54:48+5:302014-12-17T23:56:19+5:30
वैशाली डोंगरे, पूजा डोंगरे प्रथम : प्रबोधनात्मक नाटक, गाणी, डान्सची धम्माल

‘जोडी तुझी माझी’मध्ये सखींनी लुटला आनंद
इचलकरंजी : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित ‘जोडी तुझी माझी’ स्पर्धेला सखी सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लबच्या हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी प्रबोधनात्मक नाटक, गाणी, डान्स सादर केले. यावेळी सखींनीही प्रतिसाद देत आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लिंगराज कित्तुरे, लिओ क्लबचे मार्गदर्शक विनय महाजन, लायन्स सदस्य किरण महाजन व परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लायन्स क्लब आॅफ इचलकरंजी आणि डिझायनर सारीज् हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. ‘जोडी तुझी माझी’ या स्पर्धेमध्ये सखी सदस्यांनी लेक वाचवा, शिक्षणाचे महत्त्व, मुलांशी संवाद ठेवा, असे प्रबोधनात्मक नाटक सादर केले. तसेच काही स्पर्धकांनी जुन्या व नव्या पिढीतील फरक आणि नृत्य सादर केले. यामध्ये प्रथम क्रमांक वैशाली डोंगरे व पूजा डोंगरे या जोडीचा आला. द्वितीय लिंगावती कालेकर व ज्ञानदा जोशी, तर तृतीय क्रमांक नूतन व्होरा व भारती सुरपुरे यांनी पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण सायली जोशी, वर्षा देशपांडे आणि सपना शहा यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना लायन्स सदस्य महादेवी कित्तुरे आणि परीक्षकांच्या हस्ते डिझायनर सारीज्च्यावतीने साड्या बक्षीस देण्यात आल्या. इचलकरंजीत ‘लोकमत’ सखी मंच आयोजित ‘जोडी तुझी माझी’ कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना लायन्सचे अध्यक्ष लिंगराज कित्तुरे व विनय महाजन. यावेळी किरण महाजन, सायली जोशी, वर्षा देशपांडे, आदी उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात स्पर्धेतील विजेत्या जोड्या डावीकडून निलावती कालेकर, ज्ञानदा जोशी, वैशाली डोंगरे, पूजा डोंगरे, भारती सुरपुरे, नूतन व्होरा.