इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीचे जिजाऊंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:23+5:302021-06-18T04:19:23+5:30

इस्लामपूर येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी रोझा किणीकर, पुष्पलता खरात, मनीषा पेठकर, शैलजा जाधव, प्रियांका साळुंखे, प्रतिभा पाटील, ...

Jijau of Women Nationalist in Islampur greets | इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीचे जिजाऊंना अभिवादन

इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीचे जिजाऊंना अभिवादन

इस्लामपूर येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनप्रसंगी रोझा किणीकर, पुष्पलता खरात, मनीषा पेठकर, शैलजा जाधव, प्रियांका साळुंखे, प्रतिभा पाटील, सुनंदा काळे.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी महिला राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षा पुष्पलता खरात, मनीषा पेठकर, जिल्हा प्रतिनिधी शैलजाताई जाधव, युवती शहराध्यक्षा प्रियंका साळुंखे, सदस्या प्रतिभाताई पाटील, सुनीता काळे उपस्थित होत्या.

रोझा किणीकर म्हणाल्या, आऊसाहेबांनी बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग फुलवून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना अनमोल साथ दिल्याने रयतेचे राज्य निर्माण होऊ शकले. रयतेच्या राज्यात आया-बहिणींची अब्रू सुरक्षित होती. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नव्हती.

Web Title: Jijau of Women Nationalist in Islampur greets