शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भंगार साहित्यात आलेले दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:30 IST

आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देभंगार साहित्यात आलेले दागिने केले परतसमाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय

ऐतवडे बुद्रुक : आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.विक्रम दत्तू शिंदे हे चिकुर्डे व परिसरात गेली दहा वर्षे भंगार व रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी गावातीलच उदय तेली यांचे लोखंडी कपाट भंगार म्हणून खरेदी केले. घरी नेऊन ते फोडत असताना आतल्या लॉकरमध्ये विक्रम यांना स्टीलचा डबा सापडला.

डबा उघडून बघितला असता त्यामध्ये कोल्हापुरी साज, गळ्यातील हार, छल्ला असे सुमारे सहा तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने सापडले. हा ऐवज मिळताच तातडीने विक्रम यांनी उदय तेली यांच्याशी संपर्क साधला व प्रामाणिकपणे हे दागिने त्यांना परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, शिवसेनेचे अभिजित पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली