शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसमधून साडेआठ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:59 PM

रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अडीच तासांत मिरज रेल्वेस्थानकात पोहोचलेल्या कलबुर्गी एक्स्प्रेसच्या एस वन बोगीत हसूरकर यांची बॅग शोधून काढली.

मिरज (जि.सांगली) : कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या कोल्हापूर येथील सराफाच्या आठ लाख ४१ हजार रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम मात्र बॅगेत सापडली आहे. याप्रकरणी भारत रामचंद्र हसुरकर यांनी कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांत चोरीची तक्रार दिली आहे.हसूरकर यांच्या तक्रारीबाबत रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल करीत रेल्वे मिरजेत आल्यानंतर साडेतीन लाख रोख रक्कम गाडीतून हस्तगत केली. बॅगेतील साडेआठ लाखांचे सोने मात्र चोरट्यानी लंपास केले. कोल्हापूर येथील सराफ भारत रामचंद्र हसूरकर (रा. कोल्हापूर) हे सोनार व्यवसायानिमित्त कलबुर्गी येथे गेले होते. बुधवारी सकाळी कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने ते परत येत असताना प्रवासात चोरीची घटना घडली. हसूरकर प्रवासादरम्यान कुर्डूवाडी येथे चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्यानंतर एस वन बोगीतील सीटवरून अज्ञात चोरट्याने त्यांची सोने व रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. याबाबत भारत हसूरकर यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अडीच तासांत मिरज रेल्वेस्थानकात पोहोचलेल्या कलबुर्गी एक्स्प्रेसच्या एस वन बोगीत हसूरकर यांची बॅग शोधून काढली. या बॅगेत तीन लाख ५० हजार रोख रक्कम तशीच होती. मात्र, आठ लाख ४१ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे