शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिवपुरी येथे वाकुर्डे योजनेची जलवाहिनी जेसीबीने फोडली, हजारो लिटर पाणी वाया

By संतोष भिसे | Updated: February 29, 2024 15:21 IST

अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

शिराळा : शिवपुरी (ता. वाळवा) येथील परदेशी मळ्यात बुधवारी सकाळी वाकुर्डे योजनेची जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने फोडली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने सुरू केल्या आहेत.दरम्यान, पाडळीवाडी (ता. शिराळा) येथील तीन शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह खोलून पाणी चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाटबंधारेने शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शेतीसाठी वाकुर्डे योजनेतून पाणी सोडल्याने प्रश्न मार्गी लागला आहे. यादरम्यान, बुधवारी शिवपुरी येथे योजनेची बंदिस्त जलवाहिनी अज्ञाताने फोडली. योजनेतून उपसा सुरु केल्यानंतर शेतकरी दिवसा व रात्री विनापरवाना व्हॉल्व्ह सुरु करून पाणी तलावा घेत आहेत. याबाबत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी नाईक यांनी संबंधित शेतकऱ्यांना व्हॉल्व्ह सुरु करु नये असे आवाहन केले होते.

तरीही पुन्हा व्हॉल्व सुरु करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पाणीचोरीचा बंदोबस्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पोलिस ठाण्यात अर्ज दिला. शिवपुरी येथे वाकुर्डे योजनेचे पाणी पोहचले. त्यावेळी तेथील सिद्धेश्वर तलाव भरण्यासाठी शिवपुरीच्या ६० ते ७० लोकांनी रात्री व्हॉल्व सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिबंधासाठी शिराळा व वाळवा तालुक्यात पाटबंधारे व पोलिसांनी गस्त घातली. निगडी येथे रात्री व्हॅाल्व सुरु केल्याचे आढळले, तो बंद केला. यादरम्यान, शिवपुरीच्या सिद्धेश्वर तलावात पाणी सुरु असताना परदेशी मळा येथे पाईपलाईन फोडण्यात आली.

पोलिसांत तक्रारपाडळीवाडी (ता. शिराळा) येथेही तिघांनी विनापरवाना व्हॉल्व उघडून पाणी चोरी केली. या तिघांवर कारवाई करावी असा अर्ज उपविभागीय अभियंता प्रकाश बंडगर यांनी पोलिसांत दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीPoliceपोलिस