शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: ‘करेक्ट कार्यक्रमा’चा डाव, चंद्रकांत पाटील-जयंत पाटील यांच्यातील रस्सीखेच अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:12 IST

जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोण कोणाचा ‘कार्यक्रम’ करणार याची चर्चा

अशोक पाटीलईश्वरपूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष झेडपीच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन पोहचला आहे. याठिकाणी भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करून पालकमंत्र्यांना शह देण्याची खेळी जयंत पाटील यांच्याकडून सुरू असून चंद्रकांतदादाही ही खेळी अयशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. १८ मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये दोन्ही नेत्यांत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना मताधिक्य घटल्याने चांगलाच धक्का बसला. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत उरूण-ईश्वरपूर आणि आष्टा पालिकेवर मिळालेले यश जयंत पाटील यांच्या समर्थकांना दिलासादायक ठरले. या विजयानंतर आ. पाटील यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. जिल्हा परिषदेमध्ये पक्षाला क्रमांक एकवर पोहचविले.जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीत काही ठिकाणी जयंत पाटील यांनी महायुतीला चकमा देत स्थानिक आघाडीशी युती करून शिराळा आणि मिरजमध्ये सत्ता काबीज केली. कवठेमहांकाळमध्ये आ. रोहित पाटील यांनी बाजी मारली, तर आटपाडीत शिंदे सेनेच्या आ. सुहास बाबर यांनी भाजपला आस्मान दाखवले. या सर्व पडझडीमुळे आता १८ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्पर्धेत पालकमंत्री आणि जयंत पाटील यांच्यात सत्तेसाठी चांगली जुंपली आहे.कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महायुतीतील काही पक्षांचे सहकार्य घेत जयंत पाटील ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या तयारीत असले तरी चंद्रकांत पाटीलसुद्धा वरिष्ठ पातळीवर दबावतंत्राचा वापर करून महायुतीची बेरीज सत्तेच्या बाजूने करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोण कोणाचा ‘कार्यक्रम’ करणार याची चर्चा मात्र वाळवा-शिराळा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे.

जिल्ह्यातील एकाच विचाराचे नेते एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करतील. आमचे नेते आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाला निश्चित यश येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे यश जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी कामी येऊ शकेल. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Power Struggle: Patil vs. Patil in Final Round

Web Summary : A power struggle between Jayant Patil and Chandrakant Patil intensifies over Sangli ZP leadership. Both leaders are strategizing for the upcoming election, aiming to control the Zilla Parishad. All eyes are on the March 18th election.