शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या पटावर जयंत पाटील यांचे सावध पाऊल; पुत्र प्रतीक यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 19:15 IST

...तर तिरंगी लढत शक्य

अशोक पाटीलइस्लामपूर : राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे राजकीय लाँचिंग थंडावले आहे. नव्या राजकीय समीकरणात ‘टप्प्यात आला की कार्यक्रम’ अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतल्याचे वृत्त आहे.राज्यात महाआघाडी सरकार असताना मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे पुत्र प्रतीक यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी केली होती. सांगली किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाआघाडीतून लढवण्याचे संकेत होते. राष्ट्रवादीने तयारी सुरू केली होती, परंतु शिवसेना फुटल्यानंतर जयंत पाटील यांनी सावध भूमिका घेतली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला अन् राष्ट्रवादीत फूट पडली. जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपदही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या नव्या राजकीय समीकरणात आ. पाटील भाजप किंवा अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार अशी राज्यभर चर्चा रंगली. मात्र, आपण कोठेही जाणार नाही, शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहणार, असा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच पुन्हा एकदा आ. पाटील यांच्या भूमिकेवर निर्माण झालेला संशयकल्लोळ तूर्त शांत झाला आहे.गेल्या चार दिवसांत जयंत पाटील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले नसल्याबाबत तसेच ते शरद पवार यांच्यासोबतच होते यास अजित पवार यांनीही दुजोरा दिला आहे. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील शरद पवार यांचा दौरा आणि ‘इंडिया’ आघाडी बैठकीच्या नियोजनाबाबत चर्चा केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तरीही पाटील यांच्या भूमिकेवर आजही संभ्रम आहे. परंतु त्यांच्या टप्प्यात आल्यावरच प्रतिस्पर्धी नेत्यांचा कार्यक्रम करणार हे मात्र निश्चित. या सर्व घडामोडींमध्ये प्रतीक पाटील यांचे लॉंचिंग थंडावले आहे.

...तर तिरंगी लढत शक्यआगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून प्रतीक पाटील यांची महाविकास आघाडीतून उमेदवारी निश्चित झाल्यास या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकJayant Patilजयंत पाटील