बिचुद-भवानीनगर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी जयंत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:30+5:302021-03-04T04:49:30+5:30

जयंत कदम, बाळासाहेब सुतार लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील बिचुद-भवानीनगर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी जयंत ...

Jayant Kadam as the President of Bichud-Bhavaninagar Development Society | बिचुद-भवानीनगर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी जयंत कदम

बिचुद-भवानीनगर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी जयंत कदम

जयंत कदम, बाळासाहेब सुतार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील बिचुद-भवानीनगर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी जयंत रामचंद्र कदम यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब राजाराम सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एच. पाटील यांनी काम पाहिले. सचिव संतोष झेंडे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.

मावळते अध्यक्ष शंकर मोहिते यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदावर जयंत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी राजारामबापू दूध संघाचे संचालक रमेश पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य हरिभाऊ सावंत, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, भरत कदम, डॉ. सुशील सावंत-पाटील, माजी अध्यक्ष सुनील चंद यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

नूतन अध्यक्ष जयंत कदम यांचे वडील रामचंद्र कदम हे वयाच्या २७ व्या वर्षी भवानीनगर गावचे बिनविरोध सरपंच झाले होते. आज योगायोगाने नूतन अध्यक्ष जयंत यांचे वयही २७ असून तेही तरुणवयात बिनविरोध निवडून आले आहेत.

Web Title: Jayant Kadam as the President of Bichud-Bhavaninagar Development Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.