जयंत आसगावकर यांचे राजारामबापू पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST2020-12-07T04:20:08+5:302020-12-07T04:20:08+5:30

इस्लामपूर : पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे विजयी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना ...

Jayant Asgaonkar's greetings to Rajarambapu Patil | जयंत आसगावकर यांचे राजारामबापू पाटील यांना अभिवादन

जयंत आसगावकर यांचे राजारामबापू पाटील यांना अभिवादन

इस्लामपूर : पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे विजयी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आसगावकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी जयंत आसगावकर यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले. यावेळी ॲड. धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस ॲड. चिमणभाऊ डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष एम. जी. पाटील, तसेच शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, प्राचार्य सुभाषराव पाटील, संजय पाटील, सागर कासुटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : ०६ इस्लामपुर ०२

ओळी :

राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास आमदार जयंत आसगावकर यांनी अभिवादन केले. यावेळी जयंत पाटील, ॲड. चिमण डांगे, विजयबापू पाटील, ॲड. धैर्यशील पाटील, बाळासाहेब पाटील, शहाजीबापू पाटील, एस. डी. लाड, प्राचार्य सुभाषराव पाटील उपस्थित हाेते.

Web Title: Jayant Asgaonkar's greetings to Rajarambapu Patil