जयंत आसगावकर यांची कुसुमताई कन्यास सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:39+5:302021-02-06T04:49:39+5:30

इस्लामपूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांनी येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाला सदिच्छा ...

Jayant Asgaonkar's goodwill gift to Kusumatai Kanya | जयंत आसगावकर यांची कुसुमताई कन्यास सदिच्छा भेट

जयंत आसगावकर यांची कुसुमताई कन्यास सदिच्छा भेट

इस्लामपूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांनी येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर उपस्थित होते.

आमदार जयंत आसगावकर यांचा प्राचार्य सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आसगावकर म्हणाले, आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आपल्या सर्वांच्या संस्थाचालक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व समस्या सभागृहात मांडून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.

प्राचार्य सावंत म्हणाले, जयंत आसगावकर यांच्याकडून शिक्षण क्षेत्राला भरीव योगदानाची अपेक्षा आहे.

सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. सुरेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शरद माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध प्रश्नावरील निवेदने आमदार जयंत आसगावकर यांना देण्यात आली.

फोटो ओळी: ०५०२२०२१-आयएसएलएम-कुसुमताई कन्या न्यूज

Web Title: Jayant Asgaonkar's goodwill gift to Kusumatai Kanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.