जयंत आसगावकर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:06+5:302021-02-05T07:27:06+5:30

वाळवा : वेगवेगळया राजकीय भूमिका असताना सुध्दा जयंत आसगावकर यांची उमेदवारी निश्चित झाली. पुणे शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले ...

Jayant Asgaonkar will solve the problems of teachers | जयंत आसगावकर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावतील

जयंत आसगावकर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावतील

वाळवा : वेगवेगळया राजकीय भूमिका असताना सुध्दा जयंत आसगावकर यांची उमेदवारी निश्चित झाली. पुणे शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले आमदार आसगावकर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा वैभव नायकवडी यांनी व्यक्त केली.

आमदार जयंत आसगावकर यांचा वाळवा तालुक्यातील शिक्षक मतदार आभार दौरा सुरू आहे. यानिमित्ताने त्यांनी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहास सदिच्छा भेट दिली. यावेळी वैभव नायकवडी यांनी त्यांचे स्वागत केले.

जयंत आसगावकर म्हणाले, क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा आणि माझे वडील डी. डी. आसगावकर यांचे स्नेहसहकार्य होते. राजकीय गट-तट बाजूला ठेवून डी. डी. आसगावकर गटाचा म्हणून मला आणि लाड गटाचे म्हणून अरुण लाड यांना उमेदवारी मिळाली होती. यात दोघांनाही यश मिळाले.

यावेळी अजित वाजे, संभाजी थोरात, विश्वास थोरात, विश्वास मुळीक, दिलीप पाटील, बाजीराव मांगलेकर, गौरव नायकवडी, भगवान पाटील, बाबूराव बोरगावकर, दिनकर बाबर उपस्थित होते. हुतात्मा बझारचे अध्यक्ष दिनकर बाबर यांनी आभार मानले.

फोटो-२८वाळवा१

फोटो ओळ :

वाळवा येथे आमदार जयंत आसगावकर यांचे वैभव नायकवडी यांनी स्वागत केले.

Web Title: Jayant Asgaonkar will solve the problems of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.