जतचे पाेलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे काेराेनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:28+5:302021-05-17T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम मधुकर जाधव (वय ५२, रा. सौंदरी, ता. बार्शी, ...

जतचे पाेलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे काेराेनामुळे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम मधुकर जाधव (वय ५२, रा. सौंदरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचे रविवारी पहाटे काेराेनामुळे निधन झाले. दहा दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान रविवारी त्यांचे निधन झाले.
उत्तम जाधव यांचा जन्म बार्शी तालुक्यातील सौंदरी येथे शेतकरी कुटुंबात झाला. यापूर्वी त्यांनी मुंबई, सोलापूर ग्रामीण, उस्मानाबाद येथे पोलीस निरीक्षक म्हणून चांगली कामगिरी केली होती. १३ ऑगस्ट २०२० रोजी उस्मानाबादहून जत पोलीस ठाण्यास त्यांची बदली झाली होती. पदभार स्वीकारल्यानंतर कोरोना कालावधीत जनजागृतीसह चांगले काम केले होते. त्यांनी गुन्हेगारीवर वचक बसविण्यात यश मिळवले होते. धाडसी कारवाईदेखील केल्या होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर जत पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण करून घेतले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.