जतला गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:50+5:302021-06-09T04:33:50+5:30
फोटो ओळ : जत येथे नूतन गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी स्वागत ...

जतला गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात हजर
फोटो ओळ : जत येथे नूतन गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात पदावर हजर झाले. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते.
तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे (शि. द. गटाचे) तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले. दिनकर खरात यांच्याशी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जैैैनुद्दीन नदाफ, रावसाहेब वाघमोडे, भालचंद्र गडदे, शिक्षणविस्तार अधिकारी तानाजी गावरे, कवठेमहांकाळ पंचायत समितीचेे शिक्षणविस्तार अधिकारी अन्सर शेख, विषयतज्ज्ञ सुरेंद्रनाथ सरनाईक उपस्थित होते.
दिनकर खरात म्हणाले, लवकरच सर्व शिक्षक संघटनांची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. पेन्शनचा प्रश्नही मार्गी लावणार आहोत.
भारत क्षीरसागर यांनी प्राथमिक शिक्षकांच्या अडीअडचणी, प्रशासकीय अडचणी सोडवाव्यात, संघटनेला सहकार्य करावे, अशी विनंती केली.