विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी जतला उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:43+5:302021-02-05T07:25:43+5:30

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्याचे त्रिभाजन करावे, माडग्याळ व उमदी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करून ...

Jatla fast for extended Mhaisal scheme | विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी जतला उपोषण

विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी जतला उपोषण

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्याचे त्रिभाजन करावे, माडग्याळ व उमदी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करून कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अप्पर तहसीलदार कार्यालयाला जोडलेली गैरसोयीची १३ गावे पूर्वीप्रमाणे जत तहसील कार्यालयाला जोडण्यात यावीत, आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग यांच्याकडील रिक्त जागा भराव्यात, वाळेखिंडी, नवाळवाडी, बेवनूर या गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा, शेतकऱ्यांना वरदान ठरणारी सामुदायिक शेततळे योजना सुरू करावी, जत व माडग्याळ ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्यात यावी.

या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, पंचायत समिती सदस्य श्रीदेवी जावीर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी आक्की, सोमनिंग हाक्के उपस्थित होते.

फोटो मेल केला आहे.

Web Title: Jatla fast for extended Mhaisal scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.