शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

जत, तासगाव तालुक्यांस अवकाळीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:38 PM

तासगाव : जत, तासगाव परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सावळज पूर्व भागाला बुधवारी गारांसह पावसाने झोडपले. सायंकाळी पावसाने तासभर दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याने सावळज येथील अभिषेक पाटील यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी वीजवाहिन्यांचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व ...

तासगाव : जत, तासगाव परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सावळज पूर्व भागाला बुधवारी गारांसह पावसाने झोडपले. सायंकाळी पावसाने तासभर दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याने सावळज येथील अभिषेक पाटील यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी वीजवाहिन्यांचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व भागातील गावांना बुधवारच्या पावसाने चांगलेच झोडपले. या पावसाने काही दिवसांची पाण्याची चिंता दूर झाली आहे. तालुक्यात खोळंबलेल्या द्राक्ष बागांच्या खरड छाटण्यासाठी हा पाऊस गरजेचा होता. त्यामुळे या कामांना आता गती येणार आहे.जत शहर आणि तालुक्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी सकाळी आठ व दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाºयासह तुरळक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी मका, कापूस, भुईमूग, ऊस या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तर द्राक्ष, बेदाणा, आंबा, लिंबू, डाळिंब, आदी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह दहा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर काही वेळातच कडक ऊन पडले. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान पुन्हा वादळी वाºयासह दहा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.