शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

जत तालुक्यात मातृभाषा मराठी, शिक्षण मात्र कानडीत! : मातृभाषेमधून शिक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:26 IST

राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

ठळक मुद्देआठ गावे ७४ वाड्या-वस्त्या वंचित

गजानन पाटील :संख : राज्य सरकारच्या कार्यालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतूनच करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जत तालुक्यात कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माध्यमाच्या शाळाच नसल्याने मराठी भाषिकांना कन्नड शिकावे लागत आहे. तालुक्यातील ८ गावे, ७४ वाड्या-वस्त्यांवर प्राथमिक मराठी शाळाच नाहीत. २१ सीमावर्ती गावातील मराठी माध्यमांच्या शाळांना मंजुरी मिळूनसुद्धा त्या लालफितीत अडकून पडल्या आहेत.महाराष्टÑ राजभाषा अधिनियम १९६४ नुसार मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागात मराठी अनिवार्य केले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात मराठी भाषेचा वापर होतो की नाही, याची पाहणी करण्यासाठी दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र दुसºया बाजूला तालुक्यातील ८ गावे, ७४ वाड्या-वस्त्यांवर मराठी माध्यमांच्या शाळाच नाहीत. कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. ही गावे कन्नडबहुल असली तरी, त्या ठिकाणी मराठी भाषिकही आहेत. त्यांच्या मुलांना मराठीतून शिकण्यासाठी शाळाच नाहीत. मराठी शाळांबाबत तत्कालीन आ. प्रकाश शेंडगे यांनी २०१२ ला विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर १ सप्टेंबर २०१२ रोजी राज्यातील सीमाभागातील १०१ गावे, वस्त्यांवर मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामध्ये ८ गावे आणि ७४ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. सीमावर्ती भागात सातवीपर्यंत शाळा असणाºया गावात माध्यमिक शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. शासनाने प्रस्तावही मागवून घेतले; पण त्याची मंजुरी रखडली आहे.सीमावर्ती भागातील २१ गावांत मराठी माध्यमाच्या चौथी व सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १३ गावात कन्नड माध्यमाची माध्यमिक शाळा आहे. मात्र मराठी माध्यमाची शाळा नाही. मुलांच्या शिक्षणाची सोय पाच-सहा किलोमीटर दूरवरच्या शाळेत, आश्रमशाळेत अथवा पै-पाहुण्यांकडे करावी लागते. मात्र मुलींच्या शिक्षणाचा खरा प्रश्न आहे. सातवीनंतर बहुसंख्य मुलींचे शिक्षण थांबते. मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्यासाठी माध्यमिक शाळांची गरज आहे.जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. शाळा सुरू होणार म्हटल्यावर कन्नड शाळांचा पट कमी होण्याची भीती स्थानिक नेत्यांना आहे. त्यांच्या खासगी शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे येथे मराठी शाळांची गरज नाही. पुरेशी पटसंख्या नाही. मराठी शाळा सुरू करण्यासाठी ग्रामशिक्षण समित्यांचे ठरावच येऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रयत्नांना यश आले नाही.चौकट२१ गावांतील मराठी शाळांची मंजुरी लालफितीततालुक्यातील वज्रवाड, सिद्धनाथ, धुळकरवाडी, सिंदूर, गुगवाड, खोजानवाडी, तिकोंडी, भिवर्गी, जाडरबोबलाद, सुसलाद, तिल्याळ, सोनलगी, खंडनाळ, येळदरी, पांडोझरी, दरीकोणूर, साळमळगेवाडी, मोटेवाडी (आसंगी तुर्क), हळ्ळी, पांढरेवाडी, करेवाडी (कोंत्यावबोबलाद) या २१ गावांत मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांसाठी २००८ मध्ये शासनाला प्रस्ताव गेलेले आहेत. ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.चौकटआठ गावांत प्राथमिक मराठी शाळाच नाहीतकागनरी, अंकलगी, मोरबगी, अक्कळवाडी, बेळोंडगी, बालगाव, करजगी, माणिकनाळ या गावांत प्राथमिक मराठी शाळाच नाहीत. मराठी भाषिक मुलांना कन्नडमध्ये नाईलाजाने शिक्षण घ्यावे लागत आहे. ‘घरात मराठी बोलायचे, शिक्षण मात्र कन्नड’ अशी चिमुकल्यांची स्थिती आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकeducationशैक्षणिक