जतचे स्थानकप्रमुख महेश जाधव निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:10+5:302021-01-08T05:30:10+5:30

जत : जत येथील एसटी आगार स्थानकप्रमुख महेश जाधव यांनी स्लिपरकोच बसची प्रवासी तिकीट साध्या दराने करून महामंडळाचे ५१ ...

Jat station chief Mahesh Jadhav suspended | जतचे स्थानकप्रमुख महेश जाधव निलंबित

जतचे स्थानकप्रमुख महेश जाधव निलंबित

जत : जत येथील एसटी आगार स्थानकप्रमुख महेश जाधव यांनी स्लिपरकोच बसची प्रवासी तिकीट साध्या दराने करून महामंडळाचे ५१ हजार रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत एसटी प्रशासनात चर्चा आहे. परंतु निलंबनाचे आदेश अद्याप त्यांनी स्वीकारले नाहीत. या कारवाईमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे.

जत आगार व्यवस्थापक वीरेंद्र होनराव यांना याच कारणामुळे पाच दिवसांपूर्वी निलंबित केले आहे. प्रभारी आगार व्यवस्थापक म्हणून अंकुश सरगर यांच्याकडे कार्यभार दिला आहे. जाधव हे जत येथे स्थानकप्रमुख म्हणून काम करत होते. परंतु कोरोना कालावधित त्यांची मुंबई येथे नेमणूक आहे. स्लिपरकोच जत ते मुंबई बस येथून सुरू आहे. मुंबई ते जत परत आल्यानंतर ही स्लिपरकोच बस जत ते विजापूर, जत ते तुळजापूरदरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी सुरू करून त्याचा तिकीट दर स्लिपरकोच न घेता साध्या दराने घेऊन एसटी महामंडळाचे ५१ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. प्रशासनाने होनराव व जाधव यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. स्लिपरकोच बस जत ते मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक करण्यासाठी महामंडळाने दिली असताना, तिचा वापर त्यांनी इतर ठिकाणी केला होता. यासंदर्भात कर्मचारी संघटना व काही प्रवासी नागरिकांनी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महेश जाधव यांच्यावर एसटी प्रशासनाने ठपका ठेवला आहे. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. परंतु, प्रशासनाकडून त्यांना आदेश मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट

निलंबनाचे आदेश मिळाले नाहीत : महेश जाधव

स्लिपरकोच बसेस इतर ठिकाणी वापरू नयेत, यासंदर्भात आम्ही वरिष्ठांना त्यावेळी कळविले होते. या प्रकरणाशी माझा सबंध येत नाही. निलंबनाचे आदेश मला मिळाले नाहीत, अशी माहिती स्थानकप्रमुख महेश जाधव यांनी दिली.

Web Title: Jat station chief Mahesh Jadhav suspended