जतमध्ये श्रीकांत सोनवणे यांनी केले स्वखर्चातून मुरुमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:57+5:302021-08-17T04:31:57+5:30
जत : जत शहरातील प्रभाग आठमध्ये पावसाचे पाणी साचलेले रस्ते बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी स्वखर्चातून मुरूम ...

जतमध्ये श्रीकांत सोनवणे यांनी केले स्वखर्चातून मुरुमीकरण
जत : जत शहरातील प्रभाग आठमध्ये पावसाचे पाणी साचलेले रस्ते बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून दुरुस्त करून घेतले.
प्रभाग आठमध्ये बऱ्याच दिवसांपासून छत्रीबाग रोड, पठाणसाब मंदिर, पाटील गल्ली, रामराव नगर व इतर काही परिसरामध्ये गटाराचे घाण पाणी आणि पावसाचे पाणी थांबून राहते. यामुळे येथील लहान मुले व नागरिकांना रोगराईला व आजारांना सामोरे जावे लागत होते. तसेच रस्त्यावर चिखल होत असल्यामुळे वाहनांचे छोटे-मोठे अपघात होऊन नागरिकांना त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी या परिसरातील रस्त्यांचे स्वखर्चाने मुरुमीकरण करून घेतले. जेसीबीच्या साह्याने ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवून घेतले तर चर खाेदून सांडपाण्याला वाट करुन दिली.
160821\img-20210814-wa0017.jpg
प्रभाग आठमध्ये श्रीकांत सोनवणे यांनी केले स्वखर्चातून मुरुमीकरण