शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:35 IST

जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेनवार यांनी ७२१९ मते घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव केला.

ठळक मुद्देजत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीचीकाँग्रेस ७, भाजप ७, राष्ट्रवादीला ६ जागाभविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

सांगली : जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शुभांगी अशोक बन्नेनवार यांनी ७२१९ मते घेऊन भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव केला.

जत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. भाजपचे आमदार विलासराव जगताप, जतचे काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणुकीकडे भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. लोकनियुक्त नगराध्यक्षपदामुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली होती.

रविवारी सर्वत्र सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी बन्नेनवार आणि भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांच्यात चुरस निर्माण झाली होती.

शुभांगी बन्नेनवार यांनी तिसऱ्या फेरीपासून आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांचा १२८ मतांनी पराभव करून विजय खेचून आणला. रेणुका आरळी यांना ७०४१, राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार यांना ३८६१, शिवसेनेच्या शांताबाई राठोड यांना २४६ मते मिळाली.

जत नगरपालिकेतील एकूण २० जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी काँग्रेसने मित्र पक्षासह सात जागांवर विजय मिळविला. पण, बहुमताची संख्या त्यांना गाठता आली नाही. तरीही नगराध्यक्षांसह आठ जागांवर विजय मिळविल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेसचे विजयी उमेदवार आणि कंसात त्यांना पडलेली मते.संतोष कोळी (१०५८), गायत्रीदेवी शिंदे (७०१), अश्विनी माळी (९९५), इकबाल गवंडी (१०५३), नामदेव काळे (१०८८), कोमल शिंदे (७३०) या सहा जागांबरोबरच त्यांचा मित्र पक्ष असलेल्या बसपला एक जागा मिळाली आहे. संतोष कांबळे (११६६) यांनी विजय मिळवून बसपचे जतमध्ये खाते उघडले आहे.भाजपच्या नेत्यांनी जत नगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी खूप प्रयत्न केले. मंत्र्यांच्या सभांसह जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्याही सभा झाल्या होत्या. तरीही नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांना १२८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

भाजपचे सात नगरसेवक विजयी झाले. यामध्ये प्रमोद हिरवे (६३३), दीप्ती सावंत (९७२), श्रीदेवी सगरे (१०३३), जयश्री शिंदे (८८६), विजय ताड (८६८), प्रकाश माने (३९९), जयश्री मोटे (७८०) यांचा समावेश आहे. भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे आमदार विलासराव जगताप यांनाही मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार- वनिता साळे (८७१), आप्पासाहेब पवार (९५२), बाळाबाई मळगे (५८८), स्वप्नील शिंदे (६४७), भारती जाधव (८७६), लक्ष्मण एडके (९२१) यांचा समावेश आहे. या निकालाने जत शहरावरील सुरेश शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आह. 

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस