जतमध्ये बंद घर फोडून ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:50+5:302021-02-20T05:16:50+5:30

जत : जत शहरातील मोरे कॉलनी येथील सुनीता भीमराव यादव (वय ४०) यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ४० ...

In Jat, a closed house was broken into and 40,000 items were stolen | जतमध्ये बंद घर फोडून ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

जतमध्ये बंद घर फोडून ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

जत : जत शहरातील मोरे कॉलनी येथील सुनीता भीमराव यादव (वय ४०) यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवार, दि. १७ रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी जत पोलिसात यादव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी की, सुनीता यादव या पाहुण्यांचे लग्नकार्य असल्यामुळे त्या बाहेर गेल्या होत्या. त्यांची मुलगी कॉलेजला गेली होती. मुलगा कामावर गेला होता. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्याची रिंग, मणिमंगळसूत्र व रोख १० हजार रुपये लंपास केले आहे. दुपारी कॉलेजमधून मुलगी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती आईला दिल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Web Title: In Jat, a closed house was broken into and 40,000 items were stolen