शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना झिडकारले...कारखानदारांनाच का सांभाळले?; सांगली जिल्हा बँकेच्या परिपत्रकाविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने

By अविनाश कोळी | Updated: September 21, 2023 13:55 IST

बँक शेतकऱ्यांची की कारखानदारांची?

सांगली : एकरकमी परतफेड योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्यतिरिक्त अन्य कर्जांसाठी झिडकारले आहे. दुसरीकडे साखर कारखानदारांना मात्र, हव्या तेवढ्या रकमेचे कर्ज दिले जात आहे. त्यांना वेगळा न्याय का, असा सवाल करीत जत व परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा बँकेसमोर निदर्शने केली.सांगलीतील जिल्हा बँक मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी विक्रम ढोणे म्हणाले की, २० ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेने एक परिपत्रक काढले. परिपत्रकानुसार ज्या शेतकऱ्याने एकरकमी परतफेड योजनेतून थकीत कर्जाची परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यास केवळ पीक कर्जाचाच पुरवठा केला जाईल. जनावरे खरेदी, घरबांधणी, वाहन खरेदीसह अन्य प्रकारचे दीर्घ व मध्यम मुदतीचे कर्ज त्यांना मिळणार नाही. दुसरीकडे बडे थकबाकीदार असलेल्या साखर कारखानदार व सहकारी संस्थाचालकांना ओटीएसमध्ये लाभ देऊनही पुन्हा कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जातात. त्यामुळे ही बँक शेतकऱ्यांची आहे की, कारखानदारांची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी नाथा पाटील, धनाजी शिंदे, किरण पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक